अभिवादन सभेत मान्यवरांनी जागवल्या आठवणी
कन्नड, (प्रतिनिधी) लोकनेते, सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान होते. त्यांनी मराठवाड्याची अस्मिता व विकासाची भूमिका घेऊन सतत संघर्ष केला. सामान्य माणसाला पद, सत्ता देऊन त्यानी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नेते घडविणारे ते खऱ्या अर्थाने लोक विद्यापीठ होते असे प्रतिपादन कन्नड येथे लोकनेते बाळासाहेब पवार चौक येथे अभिवादन सभेत मान्यवरानी केले.
यावेळी आ. संजना जाधव, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकातराव देशमुख, डॉ. भीमराव आबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए. के. महाले, अॅड. कृष्णा जाधव, संतोष कोल्हे, संस्थेचे संचालक कृष्णा पा. निकम, विशाल आहेर, यांच्यासह टी. एस. कदम, नामदेवराव लवांदे, विठ्ठलराव जाधव, कौतिकराव पवार, वाल्मिक लोखंडे, शिंदे काका, राम पवार, राजेंद्र नलावडे, भरत जाधव, प्राचार्य डॉ. भोसले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर, उपप्राचार्य अभय आहेर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल क्षिरसागर, मुख्याध्यापक भुसारे मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय, कन्नड, सावित्रीबाई फुले विद्यालय कन्नड, शिवाजी महाविद्यालय कन्नड, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी कन्नड येथेही मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.















